सभापती पदासाठी भाजपाचे रवी लांडगे , शत्रुघ्न काटे आणि नितीन लांडगे यांच्यात चूरस होती. पण ऐनवेळी राष्ट्रवादीने अर्ज भरल्याने लढत एकतर्फी होऊ शकत नाही.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य आहेत .
यात भाजपचे १० , राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ , शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे नितीन लांडगे , रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे १६ सदस्य स्थायी समितीत आहेत.