केंद्र शसनाच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिके मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनसाठी चऱ्होली, बोऱ्हाडे वस्ती, रावेत याठीकांच्या प्रकल्पातील घरांची संगणकीय प्रणाली द्वारे वाटप सोमवारी दुपारी रामकृष्ण मोरे प्रेक्षगृहात होणार होती. पण राष्ट्रवादीच्या वतीने काळे झेंडे दाखवत त्याला विरोध केल्याने ते रद्द झाले.
भाजपच्या नेत्यांनी आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राज्य शिष्टाचाराचा अवमान केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रणच दिले नाही. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते का केले? त्यांचं शहराच्या उभारणीसाठी काय योगदान? त्यांना का बोलावले? असे प्रश्न उपस्थित केले.
राष्ट्रवादीने श्रेया घेण्यासाठी कार्यक्रमात बाधा आणली. या भाजप नेत्यांच्या वक्तव्याला काही तथ्य नाही. ८ लाख रुपये गरिबांचे लुटून घरे देण्याचे श्रेय भाजपला मिळावे. ज्या गोरगरिबांना घरे मिळणार नाहीत अशांचे महापालिकेकडे ५००० रुपये प्रमाणे २० कोटी रुपये जमा झाले आहे. ते पैसे परत करण्याची दानत दाखवायची. आज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या वेळी संजोग वाघेरे बोलत होते.