धुळे-नंदूरबारमध्ये भाजपाचा दणदणीत विजय

भाजपाचे अमरीश पटेल यांना मिळाली ३३२ मते

0

धुळे ः राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा मतमोजणी सुरू झाली आहे. यातील पहिला निकाल हाती लागला आहे. धुळे-मतदार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपाने विजय मिळविले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवाराचा २३४ मतांनी पराभव झाला आहे.

धुळे-नंदूरबारमधून भाजपाचे अमरीश पटेल यांनी विजय मिळविला आहे. त्यांना ३३२ मते मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना फक्त ९८ मतं पडलेली आहे. एकूण मते ४३७ होती, त्यातील ४३४ मतदारांना मतदान केले होते.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर रोजी झाली. त्यात महाविकास आघाडी आणि भाजपा अटीतटीच्या प्रचारात मैदानात उतरली होती. आज या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यात कोणत्या पक्षाचे पारडं जड होतंय, याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.