सामाजिक न्ययमंत्री धनंजय मुंडे यांचे बलात्कार आणि दुसरे पत्नीचे प्रकरण समाेर आल्यानंतर त्यांनी नैतिकतेने राजीनामा दिला पाहिजे. यासंर्दभात भाजप महिला माेर्चाच्या वतीने साेमवारपासून (18 जानेवारी) राज्यभरात सर्व तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालया समाेर आंदाेलन करण्यात येऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नावाने निवेदन सादर करुन मुंडे यांचे राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, रेणु शर्मा यांनी त्यांच्यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या बलात्काराचा आराेप केला आहे. या विषयावर पाेलीस तपास सुरु राहिल. परंतु करुणा शर्मा संर्दभात मुंडे यांनी जाे कबुली जबाब दिला आहे ताे गंभीर आहे. त्याआधारावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी भाजपने केली आहे. त्यानंतर थाेडी सकारात्मक दिशा मिळाली कारण राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले, संबंधित आराेप गंभीर आहे आणि या आराेपाची दखल घेतली जाईल. पवारांची यापूर्वीची पार्श्वभूमी अशी आहे की ते अशाप्रकरणात कडक धाेरण स्विकारतात. पवारांचे 50 वर्षीय राजकारणात पाहिले तर त्यांच्यातील काेणावर आराेप झाला किंवा त्यांनी काेणाला पाठीशी घातले असे झाले नाही. परंतु कालची त्यांची पत्रकार परिषद पाहता राज्यातील जनतेचा भ्रमनिरास झाला कारण ते म्हणाले पाेलीस चाैकशी करतील. त्यातून काही निष्पन्न हाेईल पाहू. रेणु शर्मा अनेकांना जाळयात ओढतात असे आराेप झाले त्याबाबत मुंबई पाेलीसां, सीबीआय, सीआयडी कडून वेगळी चाैकशी करा आणि त्या खरे की खाेटे तपासा. परंतु करुणा शर्मा बाबत मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. दुसऱ्या पत्नीबाबत, मुलांबाबत माहिती निवडणुक आयाेगास प्रतिज्ञातपत्रात दिली नाही. मुलांना शाळेत त्यांचे नाव वापरले असल्याने ती त्यांची मुले असल्याचे त्यांनी कबुल केले आहे.
भारतीय राजकारणात अशाप्रकारची ज्यावेळी प्रकरणे घडली त्याप्रसंगी राजीनामे दिले गेले आहे तीच संवेदनशीलता मुंडे यांनी ठेवून चूक झाल्याचे मान्य करत मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचे नेत्यांनी राजीनामा मागावा. पवार यांनी घुमजाव केले तरी राज्यातील जनता ते मान्य करणार नाही.
पुढे ते म्हणाले, याप्रकरणात राजीनामा आपाेआप हाेईल असे वाटत हाेते परंतु सरकारचा असंवेदनशीलता यात दिसून येताे आहे. उध्दव ठाकरे प्रबाेधनकारांचे नातू आणि बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहे ते अशी प्रकरणे का सहन करतात माहीत नाही. रेणु शर्मावर लक्ष्य केंद्रित करुन करुणा शर्माचा विषय पध्दतशीरपणे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 15 वर्षे करुणा शर्मा यांच्याशी त्यांचे शारिरिक संबंध असून दाेन मुले झाल्याचे त्यांनी मान्य करुन त्यांचेवर कारवाई केली जात नाही.