जयपूर : राजस्थानच्या पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्राप्त केले आहे.
निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा म्हणाले की, राजस्थानमधील पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल आपण ग्रामीण भागातील जनतेचे, शेतकरी आणि महिलांचा मी आभारी आहे. हा विजय म्हणजे गरीब आणि शेतकऱ्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वासाचे प्रतीक आहे.
दरम्यान, काँग्रेसशासित राजस्थानच्या राजकारणात अपवादात्मकरित्या भाजपने विरोधी पक्षात असताना हा विजय संपादन केला आहे. भारतीय जनता पक्षाने पंचायत समितीच्या ४३७१ पैकी १८३५ आणि काँग्रेसने १७१८ जागा जिंकल्या आहेत. त्याप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ६३६ जागांपैकी २६६ जागांवर, तर काँग्रेसने २०४ जागांवर विजय मिळवला आहे.