1700 कोटींचा ब्लॅक मनी, अब्जावधीची संपत्ती आणली उघडकीस

0
राजस्थान : राजस्थान मध्ये आयकर विभागाने सर्वात मोठी धाड टाकली आहे. जयपूर येथे सराफ व्यापार दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांच्या काही ठिकाणांवर इनकम टॅक्स अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. यामध्ये तब्बल १७०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे.

इनकम टॅक्स अधिकाऱ्यांची ही कारवाई पाच दिवस चालली होती. यामध्ये ५० पथके आणि २०० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. इनकम टॅक्स विभागाकडून मिळाल्या माहितीनुसार, राजस्थानातील जयपूर येथे एका सराफ व्यापारी यांच्याकडे बेकायदा काळा पैसे उघडकीस आला.

सिल्व्हर आर्ट ग्रुप, चोरडिया ग्रुप आणि गोकुल कृपा ग्रुप यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये १७०० ते १७५० कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे उघडकीस आले आहे. यासह किमती वस्तू, मूर्ती, महागडी रत्ने, वस्तू या भूयारातून सापडल्या आहेत, असे सांगितले जात आहे.

तसेच तीन बड्या व्यवसायिक ग्रुपच्या कार्यालयात २०० कोटी रुपयांच्या व्यवहारांची कागदपत्रे सापडली असून, सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आले आहे. आयकर विभागाची ५० जणांची तुकडी सलग पाच दिवस या उद्योग समूहांच्या ठिकाणी कारवाई करण्यात गुंतली होती, अशी माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.