कस्पटे वस्ती मध्ये रक्तदान शिबिरास सुरुवात

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा वाढदिवस येत्या १५ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे युवा मंचच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आज रविवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले आहे. यावेळी गणेश कस्पटे, सारिका कस्पटे, सचिन कस्पटे, मोहन कस्पटे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 39 पिंपळे निळख, विशालनगर, कस्पटे वस्ती परिसरातील रक्तदात्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गणेश कस्पटे यांनी केले आहे. सायंकाळ प्रयत्न कस्पटेवस्ती येथील गणेश कस्पटे संपर्क कार्यालयात हा शिबिर सुरु राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.