पिंपरी येथून बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह आढळला

0

पिंपरी : पिंपरी येथील मासुळकर कॉलनीतुन बेपत्ता झालेल्या 7 वर्षाच्या मुलाचा आज मृतदेह आढळून आलेला आहे. हा नक्की काय प्रकार आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. हा अपहरण, खुनाचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आदित्य गजानन ओगले (7, रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, उद्यमनगर, मासुळकर कॉलनी, पिंपरी) असे मृतदेह आढलेल्या मुलाचे नाव आहे. आदित्य हा गुरुवारी सायंकाळी पासून बेपत्ता होता.

आदित्य बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सर्व ठिकाणी, वेगवेगळ्या पथकाच्या सहायाने तपास केला.

शुक्रवारी रात्री उशिरा एमआयडीसी परिसरात आदित्य याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा नक्की काय प्रकार आहे याचा शोध सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.