नग्न व्हिडीओ करुन पुरुषाकडून खंडणी उकळली

0

पुणे : सोशल मीडियावरून ओळख झालेल्या एका पुरुषाचा नग्न व्हिडीओ करुन त्याच्याकडून खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात फेसबुक अकाऊंटधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कोंढाव बुद्रुक परिसरात रहाणारा एका 29 वर्षीय व्यक्तीला फेसबुकवरील मेसेंजरवरुन नताशा नावाच्या तरुणीने मेसेज पाठवला होता.

तीने शारीरिक संबंधाच्या बहाण्याचे त्याचा व्हॉटसअप नंबर मागून घेतला. यानंतर त्याला व्हिडिओ कॉल करुन नग्न होण्याची विनंती केली. तो नग्न होताच त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला.

यानंतर त्याला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली. मात्र त्याच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्याने त्याने 957 रुपयांची खंडणी गुगल पे व्दारे दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.