सुपरस्टार विक्रमला बाॅम्बने घर उडविण्याची धमकी 

0

मुंबई ः दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार चियान विक्रमला त्याचे घर बाॅम्बने उडवून दिले जाईल, अशी धमकी आली आहे. चित्रपटसृष्टी या धमकीमुळे धक्का बसला आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून घरात बाॅम्ब लावल्याची माहिती दिली होती. दरम्यान, पोलिसांनी शोध कुत्र्यांसोबत आणि बाॅम्ब निरोधी टीमसोबत विक्रमच्या घरी पोहोचली आणि घराची झडती घेतली.

विक्रम चेन्नईच्या बेसेंटनगरमध्ये राहतो. घराच्या परिसरात शोध घेतल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, उगीगच फसविण्यासाठी ही धमकी दिलेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी काॅल कुठून आला होता, याचे आदेश दिलेले आहेत. यापूर्वी अभिनेते विजय, अजित, सूर्या, विजयकांत आणि रजनीकांत यांनाही असे धमकीचे पोन आलेले होते.

विक्रमच्या सद्याच्या कामाची चर्चा केली तर, विक्रम हा दिग्दर्शख राजेश एम सेल्वा यांच्या ‘कदरम कोंडन’ नावाच्या चित्रपटात दिसला होता. सद्या त्याचा आगामी चित्रपट ‘कोबरा’ येत आहे, त्याच्या चित्रीकरणात तो व्यग्र आहे. या चित्रपटात क्रिकेटर इरफान खान, श्रीनिधी शेट्टी, के एस रवि कुमार, बाबू एंथनी, रोशन मॅथ्यू आणि मिरनलिनी रवि, हे दिसणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.