पिंपरी-चिंचवडमधील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी शासकीय रुग्णालयाला ‘बुस्टर डोस’
८५० बेड्सच्या रुग्णालयास ३५० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सर्वांत मोठे अर्थात ८५० बेड्सच्या मल्टीस्पेशालिटी शासकीय रुग्णालयाच्या उभारणीला ‘बुस्टर डोस’ मिळाला आहे. महापालिका प्रशासनाने रुग्णालयाच्या उभारणीसाठी ३५० कोटी रुपयांच्या खर्चासाठी स्थायी समितीची मान्यता घेली आहे. तसेच, महापालिका अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शहरातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय रुग्णालयासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दि. २० जानेवारी २०२१ रोजी पत्राद्वारे केली होती.
दरम्यान, आयुक्त पाटील यांनी आमदार लांडगे यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मौजे चिखली येथील गट नं. १६५३ येथील आरक्षण क्रमांक १/८८ या भूखंडावर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत सन २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात प्रभाग क्रमांक १ चिखली येथील गट क्रमांक १६५३ व १६५४ (गायरान) मधील आरक्षणावर ८५० बेड्सचे रुग्णालय विकसित करण्यासाठी ३५० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता आणि ५० कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
तसेच, रुग्णालयाच्या कामासाठी कोटेशन प्रक्रिया राबवून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व आर्किटेक्ट म्हणून मे. बेरी बिल्टस्पेस डिझाईन प्रा. लि. यांची नेमणूक करण्यात आली आहे, तसा ठराव महापालिका स्थायी समितीने दि. १० मार्च २०२१ रोजी मंजूर केला आहे, असे आयुक्त राजेश पाटील यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा…
वायसीएम रुग्णालयात मनुष्यबळ उपलब् व्हावे आणि प्रशासनावरील ताण कमी व्हावा. या हेतुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यत आले आहे. त्याच धर्तीवर चिखलीत होणाऱ्या प्रस्तावीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ आणि अन्य कर्मचारी उपलब्ध व्हावेत. या हेतुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आमदार लांडगे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच, या महाविद्यालयामध्ये नर्सिंग, डेंटल, फिजिओथेरपी, आयुर्वेदिक असे अभ्यासक्रम शिकवले जणार आहेत.