अकलूज येथे व्यापारी तसेच ग्रामस्थांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. अकलूज नातेपुते तसेच महाळुंग श्रीपूर माळीनगर येथील वाढती लोकसंख्या पाहता ग्रामपंचायत ग्रामस्थांना नागरी सुविधा देण्यास कमी पडत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करावे, असा प्रस्ताव शासन स्तरावर दाखल केला होता.
ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होण्याचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे, असे असतानाच राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत विनंतीपत्र दिलेलं होतं. कोणताही विचार न करता प्रक्रिया सुरू झालेली आहे.