पिंपरी : स्टॉक मार्केट मधील गुंतवणूकीकडे अनेकजण वळत असल्याचे दिसत आहे. दररोज हजारो नवीन डीमॅट खाते ओपन होत असून गुंतवणुकीचा आकडा वाढत चालला आहे. मात्र या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्यासाठी योग्य शिक्षणाची गरज आहे.
कोणत्या क्षेत्रात करियर करायचे असेल तर अगोदर पाया मजबूत असणे आवश्यक असते. हे नसेल तर नुकसान हे नक्कीच असते. शेयर मार्केटही याला अपवाद नाही. योग्य शिक्षण घेऊन गुंतवणूक केल्यास परतावा नक्कीच आहे.
‘शेयर मार्केट’ क्षेत्रात गेली 15 वर्षे शिक्षण देण्याचे काम रुची शेयर मार्केटच्या माध्यमातून डायरेक्टर दत्तात्रय विभूते करत आहेत. ISO9001 प्रमाणित असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून सुमारे 10 हजार हुन अधिक विद्यार्थी शेयर मार्केटचे शिक्षण घेऊन गुंतवणूक करत आहेत.
सागर पवार आणि स्नेहल पवार हे रुची शेयर मार्केट इन्स्टिट्यूटची शाखा हिंजवडी येथे सुरु करत आहेत. रविवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता या शाखेचे उद्घाटन होणार आहे. निवृत्त सहायक पोलिस आयुक्त जी.एस. माडगूळकर, शिवसेना गटनेते, नगसेवक राहुल कलाटे, डब्बल महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, माजी शिक्षण सभापती चेतन भुजबळ, हिंजवडी सरपंच विशाल साखरे, माजी सरपंच विक्रम साखरे, जयहिंद को.ऑ.बँकेचे चेअरमन धनाजी विनोदे, सामाजिक कार्यकर्ते नंदू भोईर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम हिंजवडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा शेजारी होणार आहे.