घरात घुसून चुलती-पुतण्यास बेदम मारहाण

0
पिंपरी : चायनीज सेंटरवर झालेल्या वादातून टोळक्याने घरात घुसून तरुणाला आणि त्याच्या चुलतीला लाकडाने, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन जखमी केले. ही खेड तालुक्यातील हेदुरज येथे घडली.

याप्रकरणी तुषार आनंदा बच्चे (21, रा. हेदुरज, ता. खेड) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
तर प्रदीप सावंत, अमोल सावंत, गणेश भोर, तुकाराम सावंत, संजय सावंत (रा. पाळू, ता. खेड), विकास कलवडे, माऊली कलवडे (दोघे रा. प-हाळे, ता. खेड), विशाल डांगले (रा. पाईट, ता. खेड), आणि अन्य दोन अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 12) दुपारी दीडच्या सुमारास तुषार आणि आरोपी यांच्यात चायनीज सेंटरवर किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या भांडणाच्या रागातून आरोपी दोन कारमधून तुषार याच्या घरी आले. चायनीज सेंटरवर झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी तुषार आणि त्याच्या चुलतीला घरासमोर पडलेल्या लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यात तुषार आणि त्याची चुलती हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तपास चाकण पोलीस करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.