‘भाईचा बडे’….’पोलिसांनी वाजवले बारा’

0

पिंपरी : खून आणि मोक्का कारवाई मध्ये येरवडा जेल मध्ये असणाऱ्या भाईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलेल्यांचे पोलिसांनी बारा वाजवले. शुभम वाणी या भाईचा ‘बडे’ साजरा करण्यासाठी आलेल्या त्याच्या समर्थकांना गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.


दिघी, परांडेनगर येथील मोकळ्या जागेत एक टोळके गोंधळ घालत असून येरवडा कारागृहात असलेल्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन धरपकड सुरु केली.

पोलिसांनी प्रशांत प्रकाश बुद्रुक (19, समर्थ कॉलनी, दिघी), अभय गजेंद्र खंडागळे (रा.येरवडा), प्रणव सतीश बारशे (19, आदर्शनगर, दिघी) यांना ताब्यात घेतले. तर अनिकेत यादगिरे, प्रसाद प्रकाश बुद्रुक, अक्षय गायकवाड, सुंदर गवळी आणि इतर 3 ते 4 हे पळून गेले आहेत. त्यांच्याकडून कोयता आणि तलवार जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी माहिती घेतली असता खून आणि मोक्का यामध्ये कारागृहात असणाऱ्या शुभम वाणी याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे समर्थक एकत्र आल्याचे समोर आले. ताब्यात घेतलेल्याना दिघी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पळून गेलेल्यांचा शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.