डोक्यात वार करुन तरुणाचा निर्घृण खून

0

पिंपरी : धारदार हत्याराने डोक्यात वार करुन तरुणाचा भरदिवसा खून करण्यात आला. हा प्रकार चिखली, साने वस्ती येथे रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडला.

साने कॉलनी रोडवर, मोरेवस्ती येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कानिफनाथ क्षीरसागर (रा. पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत कानिफनाथ त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलासोबत रविवारी सकाळी चिखली परिसरात आला होता. त्यावेळी त्याचा पाठलाग करत आलेल्याने त्याच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर डोक्यात दगड मारून निर्घृणपणे खून केला.

भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.