पुण्यात भरदिवसा बिल्डरवर गोळीबार

0

पुणे : पुण्यात भरदिवसा एका बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार केल्याची घटना आज घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. यात 2 ते 3 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. ही घटना डुक्कर खिंड भागात घडली आहे.

बांधकाम व्यवसायिक रवींद्र सांगुदे यांच्यावर गोळीबार झाला आहे. सुदैवाने यात ते जखमी झालेले नाहीत याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र हे साडे बारा वाजण्याच्या सुमारास डुक्कर खिंड परिसरातून जात होते. या दरम्यान दोन दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांना अडविले. एकाने पिस्तूल रोखत त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले आहेत. हल्ला कोणी आणि का केला अद्याप समजू शकलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.