पिंपरी : गस्तीवर असणार्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका चोरटय़ाला अटक करून त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीचा माल जप्तकेला आहे.
गुन्हे शाखा, युनिट चारचे सहायक पोलीस निरीक्षक सिध्दनाथ बाबर, सहाय्यक पोलीस फौजदार जाधव, चव्हाण, शिंदे हे वरिष्ठपोलीस निरीक्षक पंडित यांच्या आदेशाने घरफोडी व वाहन चोरी अनुषंगाने पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एक संशयित इसम हा पिंपळेसौदागर नाशिक फाटा या दिशेने जात आहे अशी माहिती मिळाली.
पोलिसानी त्याला शिताफिने ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता रतिकांत जग बंधू स्वाईन (30 , रा. कवडे नगरसांगवी पुणे) हा असून याने सांगवी पोलीस स्टेशन, वाकड पोलीस स्टेशन, हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा अजमतुल्ला अब्दुल कयूम खान (रा. पिंपळे गुरव पुणे) यास विकल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून1,49,000 रु किमतीचा मुद्दमाल जप्त केला आहे.
आरोपी हा रेकॉर्ड वरील असून यापूर्वी तो हिंजवडी व रावेत पोलीस ठाणे येथे प्रत्येकी एक एक गुन्ह्यात अटक झालेला आहे.