मुंबई : “आवाज नाही, धूर नाही असे फटाके आघाडी सरकारचे. धूर न सोडणारे फटाके फक्त महाआघाडी सरकारमध्येच मिळतात. कलाबेन डेलकर यांची निशाणी धनुष्यबाण नव्हे तर फलंदाज ही होती. गद्दारी बनून मुख्यमंत्री बनले. केंद्रात धडक मारायची म्हणतात, पण डोकं ठिकाणावर नाही”, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली.
नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. राणे पुढे म्हणाले की, “गुणवत्ता नसताना मुख्यमंत्री पदावर टिकवल्यामुळे बारामतीच्या कार्यक्रमांत शरद पवारांचे तोंडभरून कौतुक होत आहे. महाविकास आघाडीतील अनेक मंत्री तुरुंगात जाणार आहेत. सत्ता तुमची असताना राज्यात ड्रग्ज येतातच कशी?”, अशी चौफेर टीका नारायण राणे यांनी केली आहे.
वास्तविक गेल्या एक दीड वर्षात जी न भूतो इंधन दरवाढ झाली त्या माध्यमातून केंद्राच्या तिजोरीत लाखो कोटींची भर पडली आहे तशी ही जनतेची केलेली लूटच आहे. तेव्हा सामान्य जनतेला दिलासाच द्यायचा होता तर तो समाधानकारक द्यायचा होता. पण त्यासाठी इंधन करकपात जास्त करावी लागली असती आणि ती करण्याचा मोठेपणा दाखवावा लागला असता ती सरकारने संधी गमावली आहे.