सलग 12 तास प्रयोग सादर करुन जादूगार मित्रांनी केली आपल्या सहकाऱ्यांना आर्थिक मदत

0

पुणे : गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून जगभरात आणि आपल्या देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे संपूर्ण जग स्तब्ध केले आहे, त्यातच सांस्कृतिक कलाक्षेत्राचे भयावह नुकसान होऊन लाखो कलाकार, जादूगार आणि बॅकस्टेज कलाकार व त्यांचे कुटुंबिय उपासमारीने त्रस्त झाले आहेत. अशातच अनेक संस्था, दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक भावनेने रेशन किट वाटून यथाशक्ती योगदान दिले आहे.

‘लाईटबिल, घरभाडे, पेट्रोल, दवाखाना, गॅस सिलेंडर यासाठी खिशात पैसे शिल्लक राहिलेले नाहीत या परिस्थितीत कोणापुढे कसा हात पसरायचा याच विचाराने कलाकार मेटाकुटीला आला. परंतु त्यांची हीच हतबलता पाहुन जादूगार भुजंग, जादूगार भरत काकडे, जादूगार प्रसाद कुलकर्णी आणि जादूगार रघुराज (विनायक कडवळे) या चार जादूगार मित्रांनी जाणली आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन हे चार जादूगार एकत्र आले.

या चौघांनी ३० मे २०२१ रोजी सकाळी १० पासून ते रात्री १० वाजेपर्यंत न थांबता सलग १२ तास फेसबुक लाईव्हवर जादूचे प्रयोग सादर केले. त्यातून स्वाभिमानाने जादूग्रेमी रसिक प्रेक्षकांना सोशल मीडिया आवाहन केले. जर आमचा कार्यक्रम आवडला तरच फक्त ९९ रुपये ची मदत करा. या आव्हानाला प्रतिसाद देत एकूण ३०,००० रुपये जमा झाले. या रकमेतून प्रत्येकी एक हजार अश्या एकूण ३० गरजू जादूगार कलावंत, बॅकस्टेज कलाकार यांना रोख रक्कम चेक स्वरूपात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते देण्यात आला.

या कार्यक्रमाला शशिभाऊ कोठावळे, मनोज माझिरे, मा. विनोद धोकटे, अरुण गायकवाड व दिलीप गांधी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.