कॅन्सरची लस शाळेत मिळणार, 9 ते 14 वयोगटातील मुलींना HPV लस

0

नवी दिल्ली : केंद्र सरकार 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस शाळांद्वारे पुरवणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत माहिती दिली आहे.

प्रत्येक जिल्ह्याला इयत्ता 5 वी ते 10 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या मोजण्यास सुरुवात करण्यास सांगितले आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी भारतात विकसित HPV लस पुढील वर्षी एप्रिल-मे पर्यंत उपलब्ध होईल. भारतातील 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या अहवालानुसार, भारतातील प्रत्येक 53 पैकी एका महिलेला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे.

केंद्र सरकारने लसीकरणासाठी शाळांमध्ये एचपीव्ही लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये पालक आणि शिक्षकांसोबत बैठका घेऊन पालकांमध्ये जनजागृती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी सरकारी आणि खासगी शाळा व्यवस्थापन मंडळांशी समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्रालयाचे सचिव संजय कुमार आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी एचटीला सांगितले की गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एक टाळता येण्याजोगा आणि बरा होणारा आजार आहे. हा आजार लवकर ओळखून त्यावर प्रभावी उपचार करणे फायदेशीर ठरेल.

कॅन्सर जनजागृतीबाबत शाळांमध्ये आरोग्य चर्चा आयोजित केली जात आहे. आरपीएस पब्लिक गर्ल्स स्कूल, पाटणा येथे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व इयत्ता 12वी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. एका अहवालानुसार, मागील २४ तासांत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे ९५-१०० महिलांचा मृत्यू झाला आहे. जगात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात होतात. जगभरात दरवर्षी सुमारे 80,000 प्रकरणे नोंदवली जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.