हिंजवडी : मारुंजी ग्रामपंचायत साठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांनी सर्वपरीने प्रचार सुरु केला आहे. आज रविवारचा दिवस साधून उमेदवारांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे अधिकृत उमेदवार अर्जुन बाबुराव बुचडे, कावेरी संदीप बुचडे, दत्तात्रय तुकाराम सुतार यांना ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाले.
राज्यात 14 हजारहून अधिक ग्रामपंचायत निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार आहेत. अनेक ठिकाणी थेट दुहेरी लढत आहे. त्यामुळे उमेदवार मतदारा प्रयत्न पोहचण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न करत आहेत. मारुंजी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे अधिकृत उमेदवार अर्जुन बाबुराव बुचडे, कावेरी संदीप बुचडे, दत्तात्रय तुकाराम सुतार यांनी रविवारी प्रचारा दरम्यान वार्ड क्रमांक ४ मधील मतदारांशी भेटी घेतल्या. ग्रामस्थांच्या समस्या जाणुन घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी नक्की प्रयत्न करणार अशी आश्वासने दिली. तसेच जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवाराला मतदान का करावं हे पटवुन दिले.
यावेळी राघूजी बुचडे, आप्पासाहेब बुचडे, शंकर बुचडे, अमोल बुचडे, संतोष बुचडे, सुधीर बुचडे, सुखलाल महाराज बुचडे, बाबासाहेब बुचडे, मच्छ शिंदे, प्राचिताई बुचडे, बाजीराव जगताप, दशरथ जगताप, गावातील ज्येष्ठ नेते, प्रतिष्ठित नागरिक, महिला, तरूण वर्ग प्रचाराला उपस्थित होता.
मतदारांशी संवाद साधला तेव्हा मतदारांशी संवाद साधला तेव्हा मतदारांनी जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार आता पर्यंतच्या उमेदवारापेक्षा सुशिक्षित आहेत. गावच्या विकासाच्या हेतूनेच ते उभे राहिले असून ते नक्की गावचा विकास करतील अशी प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली.