वृध्दाश्रमातील सोन्याचे दागीने चोरुन फरार ‘केअर टेकर’ गजाआड
हिंजवडी पोलिसांच्या तपासी पथकाची कामगिरी
पिंपरी : वृध्दाश्रमातील अडीच लाख रुपयांच्या सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या केयर टेकरला हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.
संकेत माणीकराव झाडे (२०, मुळ रा. खोक, ता. जिंतुर जि. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गोकर्णा बाबासाहेब बाभळकर (४४, रा. प्लॅ नं २९, ऑडी शोरूमजवळ, रावीनगर, सुस, ता. मुळशी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकर्णा बाबासाहेब बाभळकर हे जीव्हाळा वृध्दाश्रम चालवितात. त्यांना कामात मदत करण्यासाठी केअर टेकर म्हणून संकेत झाडे हा होता.
१९ ऑगस्टला वृद्धाश्रमातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. त्यानंतर संकेत झाडे हा अचानक मंगळवारी (ता. ११) त्याचे गावी गेला. त्यानंतर रविवारी (ता. १६ ) रोजी गोकर्णा बाभळकर यांनी दागीने पहिले असता मिळून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास करीत असताना तपास पथकातील अंमलदार स्वामीनाथ जाधव, व पोलीस नाईक नरळे, गडदे, यांचे पथकाने आरोपीच्या गावी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे.
त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेले २ लाख ३५ हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ६ दिवसांची रिमांड कोठडी ठोठावण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,
अप्पर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त प्रशांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस अंमलदार स्वामिनाथ जाधव, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत यांनी केली आहे.