पिंपरी : मोठ्या प्रमाणावर विदेशी नागरिक वास्तव करत असलेल्या पिंपळे गुरव भागात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 16 नायझेरियन तरुणींना सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली आहे.
चार महिला या इतर तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचं समोर आले आहे. या सर्व तरुणी नायजेरियन असून काही तरुणींकडे पासपोर्ट नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सांगावी आणि सामाजिक सुरक्षा पथक करत आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिली आहे.
पिंपळे गुरव भागातील मोरया पार्क परिसरात एका प्लॅट मध्ये या सर्व तरुणी राहत आहेत.
ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस उपनिरीक्षक कविता रूपनर, हेमा साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, बारकुले, अस्वले, गवारी, करचुंडे, मुठे, भारती, मारुतीराव जाधव, महाजन, तिडके, लोंढे, शिरसाठ, कोकाटे, कारोटे, महिला पोलीस कर्मचारी, गावडे, जाधव, माने, कचरे, पठाण, गाडेकर, मिसाळ यांच्यासह रेस्क्यू फाउंडेशन हडपसर यांचा सहभाग होता.