आज दिल्लीत शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी दिल्ली येथे अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी 15 दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. शनिवारी दिल्ली-जयपूर व दिल्ली-आगरा महामार्ग अडविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी हजारो शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत.

कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सामान्य लोकांचा विचार करून आंदोलन मागे घ्या. चर्चेने सगळ्याच गोष्टी सुटतील, अशी विनंती पुन्हा केली. परंतु शेतकऱ्यांनी या प्रस्तावाबाबत अधिकृत काहीही कळविले नसल्याचे म्हटले आहे. मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात पलवल येथून शेतकरी येत असताना बदरपूर सीमेवर कडक सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली. नोएडा येथे दलित प्रेरणास्थळावरही अनेक शेतकऱ्यांनी धरणे दिले आहे. आज येथून तिन्ही कायद्याची अंत्ययात्रा काढण्यात आली आणि प्रतीकात्मक दहन केले.

दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसह सर्व राज्यांत टोल नाके व रस्ते बंद करण्याचे त्यांनी ठरविले आहे. काही ठिकाणी रेल रोकोही केला जाईल, असे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.