आमदार लक्ष्मण जगताप यांना चंद्रशेखर बावनकुळे, अनिल बोंडे, रामदाल तडस, भीमराव तापकीर, संतोष दानवे, प्रकाश आबिटकर, उज्ज्वल निकमांनी वाहिली श्रद्धांजली

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राज्यातील अनेक नेत्यांनी मंगळवारी (दि. १०) त्यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनिल बोंडे, खासदार व खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस, आमदार भीमराव तापकीर, संतोष दानवे, प्रकाश आबिटकर, ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप जगताप यांचे सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. हे सर्वजण त्यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन कुटुंबियांचे सांत्वन करत आहेत.

मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनिल बोंडे, खासदार व खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस, आमदार भीमराव तापकीर, संतोष दानवे, प्रकाश आबिटकर, ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विजय चौधरी, कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंत गावडे, हिंदकेसरी योगेश दोडके, कुस्तीगीर संघटनेचे दिलीप बालवडकर, किशोर नखाते, काळुराम कवितके, संतोष माचुत्रे यांनी पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्वनी जगताप, बंधू शंकर जगताप व कुटुंबातील इतर सर्व सदस्यांसोबत संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. सर्वांची विचारपूस करत दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याशी संवाद साधून त्यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.