चांद्रयान 3 : 13 मार्चला लॉंच होण्याची शक्यता

0

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 13 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच करू शकते. त्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये बुधवारी चांद्रयान-3चे एन्कॅप्स्युलेटेड असेंबली LVM3 सोबत जोडण्यात आले. इस्रोने व्हिडिओ ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

जर चांद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले तर भारत असे करणारा चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने आपले अंतराळ यान चंद्रावर उतरवले आहे.

चांद्रयान-2 मिशन 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. सुमारे 2 महिन्यांनंतर 7 सप्टेंबर 2019 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेले विक्रम लँडर क्रॅश झाले. तेव्हापासून भारत चांद्रयान-3 मोहिमेची तयारी करत आहे.

रशियाने आपली मून लँडर मोहीम पुढे ढकलली आहे. जमिनीच्या पायाभूत सुविधांच्या अतिरिक्त तपासण्या पूर्ण न केल्यामुळे असे झाले आहे. यापूर्वी 2022 मध्येही तांत्रिक अडचणींमुळे रशियन मिशन पुढे ढकलण्यात आले होते. अशा परिस्थितीत भारताच्या चांद्रयान-3 ला रशियाच्या आधी चंद्रावर उतरण्याची संधी आहे.

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान-2 मोहिमेत आम्ही अपयशी ठरलो. प्रत्येक वेळी आपण यशस्वी व्हावेच असे नाही, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातून शिकून पुढे जायला हवे. ते म्हणाले की, अपयश आले म्हणजे आपण प्रयत्न करणे सोडून दिले. चांद्रयान-3 मोहिमेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल आणि आपण इतिहास घडवू.

Leave A Reply

Your email address will not be published.