नवी दिल्ली : देशात १ डिसेंबरपासून ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्याचा नियमांमध्ये बदल होणार आहेत. ओटीपीच्या आधारे पैसे काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी नवी पद्धत वापरावी लागणार आहे.
सध्या ही सुविधा फक्त पंजाब नॅशनल बँकने सुरू केली आहे. यासंबंधी बँकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. इतकंच नाही तर यासंदर्भात ग्राहकांना मेसेजेसदेखील पाठवले जात आहेत. तर याआधी एसबीआयनेही ही सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे हा नियम आता सर्व बँका लागू करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.
पंजाब नॅशनल बँकेने ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार १ डिसेंबरपासून एटीएममधून दहा हजाराहून काढण्यासाठी ओटीपी देणं आवश्यक असणार आहे. या नियमानुसार, नाईट हावर्स म्हणजेच रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत लागू करण्यात येईल. यावेळी एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांना त्यांचा मोबाइल ओटीपी देणं महत्त्वाचं असले.
स्टेट बँक ऑफ इंडियाने १ जानेवारी २०२० पासून एटीएममधून ओटीपी आधारे पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. यामध्ये एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममध्ये सकाळी आठ ते सकाळी आठ या दरम्यान दहा हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्यासाठी ओटीपी द्यावा लागणार आहे. पण आता ही सुविधा 24 तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे.