ऑनलाईन पोर्टल nvsp.in या संकेतस्थळावर मतदार नोंदणी प्रक्रियेत बदल करावा : आमदार जगताप

0

पिंपरी : मतदान हा लोकशाहीचा आत्मा आहे त्यामुळे लोकनियुक्त सरकारच्या स्थापनेसाठी मतदानाला पर्याय नाही. याकरिता राज्यात विशेषतः  पुणे जिल्ह्यात  नवीन मतदार नोंदणी ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे सुरु आहे. उद्योगनगरीतील व आय टी क्षेत्रातील तसेच मोठ- मोठ्या सोसायट्यांमधील नागरिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन  सुविधेचा वापर करून नाव नोंदणी करीत आहे.

परंतु ऑनलाईन पद्धतीने मतदार यादी मध्ये समाविष्ट होणाऱ्या नागरिकांची नावे आपल्या जवळच्या  बूथमध्ये न येता प्रभागात किंवा मतदार संघात इतरत्र बूथ मध्ये समाविष्ट होत असल्याने नोंदविलेल्या नागरिकांना प्रत्यक्ष घरापासून लांब असलेल्या बूथवर किंवा इतरत्र प्रभागात  मतदानाकरिता जावे लागते. परिणामी अनेक नागरिक मतदान करण्यास जात नसल्याने मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम होतो.

ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेत नाव नोंदणी करतानानागरिकांचे नाव घराशेजारील बूथ मध्ये समाविष्ट होण्याकरिता ऑनलाईन पोर्टल nvsp.inया संकेतस्थळावर त्या बूथमधील इतर मतदाराचा किंवा मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबातील  बूथ क्र. आणि मतदान केंद्र नमूद करण्याचा पर्याय उपलब्ध केल्यास नव्याने नोंदणी करणाऱ्या मतदाराचे नाव  घराशेजारी जवळच्या  बुथवरील मतदान केंद्रावर समाविष्ट होईल तसेच भौगोलिकदृष्ट्या जवळच्या मतदान केंद्रावर नाव सामविष्ट झाल्यास निवडणूक काळात BLO , BLA  व निवडणूक कर्मचाऱ्याना मतदारांना घरोघरी मतदार  स्लीप पोहचविणे सोयीचे होईल आणि लोकशाहीच्या या उत्सवात ‘संकल्प माझा मतदानाचा, मी मतदान करणारच’ या निवडणूक आयोगाच्या घोषवाक्याचा खऱ्या अर्थाने सार्थक होऊन मतदान टक्केवारीत वाढ होण्यास मदत होईल. आणि सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना आपल्या  जास्तीत  जास्त मतदान करून घेण्याचे निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट सफल होईल.

लोकशाही व्यावस्थेमध्येच भयमुक्त व निःपक्षपाती वातावरणाबरोबरच मतदाराला आपल्या भागातील लोकप्रतिनिधीला निवडून देण्याकरिता मतदाराचे  नाव स्वत:च्या परिसरातील नजीकच्या मतदान केंद्र व बूथवर समाविष्ट झाल्यास  निवडणूका पार पडणे सोयीचे होईल, व भारतीय लोकशाही अधिक सक्षम, बळकट व लोकाभिमुख होईल. तरी,ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेत नाव नोंदणी करतानाऑनलाईन पोर्टल nvsp.in या संकेतस्थळावर बदल करणेबाबत NIC व निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करून त्यांच्या निर्देशनास आणून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यची मागणी पत्राद्वारे केली. 

Leave A Reply

Your email address will not be published.