नवी दिल्ली : दिल्ली न्यायालयानं ज्युनिअर कुस्तीपटू सागर घनकर हत्येप्रकरणी ऑलिम्पियन सुशील कुमारसह 18 जणांविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगल आणि गुन्हेगारी कट रचणे यांसह अन्य कलमांखाली आरोप निश्चित केले.
दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील छत्रसाल स्टेडियममध्ये 4 मे 2022 च्या मध्यरात्री कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. ज्यात सागर धनकर नावाच्या कुस्तीपटूचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचंही नाव समोर आलं. तपासादरम्यान पोलिसांना एक व्हिडिओही सापडला, ज्यामध्ये सुशील कुमार सागर धनकरला मारहाण करताना दिसतोय. यानंतर पोलिसांनी सुशील कुमारला अटक केली.
सागर घनकरच्या हत्येनंतर 20 दिवसानंतर सुशील कुमार आणि त्याचा सहकारी अजय यांना 20 दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. आपल्या साथीदाराबरोबर एकाला भेटायला स्कूटीवर जात असताना सकाळी सुशील कुमार व त्याचा साथीदार अजय याला दिल्ली पोलिसांनी मुंडका मेट्रो स्टेशनवरून अटक करण्यात आली.
सहकारी कुस्तीपटू सागर धनकरच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सुशील कुमारला रेल्वेनंही नोकरीतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. सुशील कुमारवर हत्येचा आरोप असून याप्रकरणी चौकशी सुरू असल्यानं त्याला नोकरीवर ठेवता येणार नसल्याचं रेल्वेकडून कारण देण्यात आलं होतं.सुशील कुमारला अनेक पदोन्नतीनंतर उत्तर रेल्वे येथे डेप्युटी चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून नियुक्त केलं होतं. सागर धनकर हत्या प्रकरणात प्रथम दिल्ली सरकारने पत्र लिहून सुशीलच्या अटकेविषयी रेल्वेला कळवले होते. यानंतर रेल्वे बोर्डाने उत्तर रेल्वेला पत्र लिहिले. यानंतर सुशीलला निलंबित करण्यात आले आहे.
सुशील कुमारनं तिहार जेलमध्ये असून त्यानं प्रशासनाला आपल्या सेलमध्ये टीव्ही बसविण्याची मागणी केली. सुशील कुमारनं तिहार कारागृह प्रशासनाला लिहलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीत तो एकमेव कैदी असल्यानं त्याला एकटं वाटतंय. त्यामुळं त्याला टीव्हीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, जेणेकरून कुस्ती खेळात काय चाललंय याची माहिती त्याला मिळेल.