15 धावांनी गुजरातचा पराभव करत चेन्नई सुपर किंग फायनलमध्ये

0

चेन्नई : आयपीएल-16 मधील क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गुजरात टायटन्सला (GT) धावांनी हरवत फायनलमध्ये धडक दिली. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 षटकांत सर्व गडी गमावून 157 धावाच करता आल्या.

गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 42 धावा केल्या. त्यानंतर राशिद खानने 30, दसुन शनाकाने 17, विजय शंकरने 14, तर वृद्धिमान साहाने 12 धावा केल्या. तर चेन्नईकडून दीपक चहर, महीश तीक्षणा, रविंद्र जडेजा, मथीषा पथिरानाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडेने 1 विकेट घेतली. तत्पूर्वी गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी बाद 172 धावा करत गुजरातला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले.

याचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर वृद्धिमान साहा तिसऱ्या षटकात 12 धावांवर बाद झाला. दीपक चहरने त्याची विकेट घेतली. त्यानंतर सहाव्या षटकात महीश तीक्षणाने हार्दिक पंड्याला 8 धावांवर बाद केले. तर अकराव्या षटकात रविंद्र जडेजाने दसुन शनाकाला 17 धावांवर बाद केले. त्यानंतर तेराव्या षटकात रविंद्र जडेजाने डेव्हिड मिलरला 4 धावांवर आऊट केले. तर पुढच्याच षटकात दीपक चहरने शुभमन गिलला 42 धावांवर आऊट केले. तर पंधराव्या षटकात तीक्षणाने राहुल तेवतियाला 3 धावांवर बाद केले. तर अठराव्या षटकात मथीषा पथिरानाने विजय शंकरला 14 धावांवर बाद केले. याच षटकात दर्शन नलकांडे शून्यावर धावबाद झाला. तर पुढच्याच षटकात तुषार देशपांडेने राशिद खानला 30 धावांवर आऊट केले. यानंतर नूर अहमद आणि मोहम्मद शमीने शेवटपर्यंत फलंदाजी करत संघाची धावसंख्या 157 वर नेली. शमी शेवटच्या चेंडूवर आऊट झाला.

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 60 धावा केल्या. त्यानंतर डेवॉन कॉनवेने 40, रविंद्र जडेजाने 22, तर अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडूने प्रत्येकी 17 धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर दर्शन नलकांडे, राशिद खान आणि नूर अहमदने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला ओपनर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 87 धावांची भागीदारी केली. अकराव्या षटकात ऋतुराजला 60 धावांवर बाद करत मोहित शर्माने ही जोडी फोडली. त्यानंतर पुढच्याच षटकात नूर अहमदने शिवम दुबेला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर पंधराव्या षटकात दर्शन नलकांडेने अजिंक्य रहाणेला 17 धावांवर बाद केले. तर पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने डेवॉन कॉनवेला 40 धावांवर बाद केले. तर अठराव्या षटकात राशिदने अंबाती रायुडूला 17 धावांवर बाद केले. त्यानंतर एकोणिसाव्या षटकात मोहित शर्माने धोनीला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीने जडेजाला 22 धावांवर बाद केले. चेन्नईच्या 20 षटकांत 7 गडी बाद 172 धावा झाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.