मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिली?

पुणे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

0

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेची पुणे न्यायालयाने दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि नवं सरकार स्थापन झालं. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान झाले. आता एकनाथ शिंदे यांना राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केलीय. त्यामुळे पुणे न्यायालयाने आता याप्रकरणी चोकशीचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.