मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत. मंत्री संदीपान भुमरे यांचे मतदारसंघ पैठणमध्ये सभा घेणार आहेत. त्यापूर्वी आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सकाळी दहा वाजता होणार आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
12 च्या दरम्यान शिंदे हे मुंबईहून शासकीय विमानाने औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळावर जातील. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता ते चिकलठाणा औरंगाबाद विमानतळ येथे आगमन आणि मोटारीने पैठणकडे प्रस्तान करतील. दुपारी 1.40 वाजता संत एकनाथ महाराज मंदिरास भेट देतील आणि नाथ महाराजांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 1.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील.
दुपारी 2 वाजता कावसानकर स्टेडियम पैठण येथे ते जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी 3.30 वाजता पैठण येथून मोटारीने आपेगावकडे जातील. दुपारी 3.45 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास भेट व दर्शन घेतील. सायंकाळी 4.15 वाजता आपेगाव, ता.पैठण येथून मोटारीने पाचोड ता. पैठणकडे प्रयाण करतील. त्यानंतर सायंकाळी 4.45 वा. संदिपान भुमरे यांच्या निवासस्थानी जातील. सायंकाळी 5.15 वाजता पाचोड ता.पैठण येथून मोटारीने आडूळ मार्गे चिकलठाणा विमानतळ औरंगाबादकडे जातील. त्यांनंतर सायंकाळी 6 वाजता चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद येथे आगमन करतील आणि शासकीय विमानाने मुंबईकडे येतील.