तळेगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तळेगाव स्टेशन येथे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, उद्योजक संतोष शेळके यांनी सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी दि. 20 दुपारी तळेगाव दाभाडे मार्गे भीमाशंकर येथे जात होते. त्यावेळी तळेगाव स्टेशन येथे त्यांना जनसेवा विकास समितीकडून काही वेळ थांबण्याची विनंती केली व सत्कार करण्यात आला.
जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, निखिल भगत, दिलीप डोळस,भाजपाच्या माजी नगरसेविका शोभा भेगडेसह नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी दुपारी तळेगाव दाभाडे मार्गे भीमाशंकर येथे जात होते. तळेगाव स्टेशन येथे मराठा क्रांती चौकात त्यांना काही वेळ थांबण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी देखील सत्कार केला. यावेळी उपस्थितांनी एक मराठा लाख, मराठा अशा घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करत एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. सत्कार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तळेगाव दाभाडे येथील प्रश्न सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.