भंडारा दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना दिले चौकशीचे आदेश

0

मुंबई ः भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगी १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली, त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांची चर्चा करून चौकशीचे आदेश दिलेले आहेत.

मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रुग्णालयातील आऊट बर्न युनिटमधून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर नर्सने दरवाजा उघडून पाहिले तर, त्या कक्षामध्ये धुरांचा लोट बाहेर आला. तातडीने रुग्णालयातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बचावकार्य सुरु झाले. ज्या ठिकाणी आग लागली, त्या विभागात आऊट बर्न आणि इन बर्न अशी दोन युनीटे आहेत. इन बर्नमधील ७ बालके वाचण्यात यश आले. मात्र, आऊट बर्नमधील १० मुलांचा होरपळून मृत्यू झाला. शाॅर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

राहूल गांधी व्यक्त केली हळहळ

या घटनेवर काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांनी हळहळ व्यक्त करत जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत राज्य सरकारने करावी, असे आवाहनही केले आहे. राहूल गांधी ट्विटवरून म्हणाले की, “महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना वेदनादायी आहे. जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबांबद्दल माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने सर्वोतोपरी मदत करावी, असं आवाहन मी करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.