मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद 

0
मुंबई ः आज दुपारी एक वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंख्यमत्री नेमक्या घोषणा करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे, यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काॅंग्रेस पक्षनेत्या सोनिया गांधी यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना आलेले पत्र, उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला दिलेली स्थगिती आणि राजकीय वर्तुळात विरोधकांनी केलेली टीका यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके काय उत्तर देणार आहेत, याची उत्सुकता राजकारणातील जाणकारणान्यांना लागून राहिलेली आहे.
 तसेच दुसरीकडे राज्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढला आहे, ही चिंताजनक बाब असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा परिस्थितीत कोणता निर्णय घेतील आणि दुसरीकडे लसीकरण मोहिमेची युद्धपातळीवर चाललेली तयारी यासंदर्भात काय सांगतील, याच्याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

संबंधित बातमी : करोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले

Leave A Reply

Your email address will not be published.