मुंबई : ब्रिटन आणि इतर देशांमध्ये करोनाची नवी प्रजाती आढळल्याने जागतिक पातळीवर प्रतिबंधात्मक हालचाली वेगाने होत आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्यातही मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणांना सावध राहण्याबरोबरच चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा, मास्कच्या वापर बंधकारक आणि जागरुक राहण्याचे आवाहन केलेले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्या ऑनलाइन साधला. करोनाची स्थिती आणि घ्यावयाची काळजी, तसेच लसीकरणाबद्दलची तयारी याबाबतही आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ”करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे. आता दुसऱ्या विषाणुच्या पार्श्वभूमीवर गाफील चालून राहणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा साठा पुरेसा करून ठेवावा, अलीगकरण आणि विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवा, हा विषाणू ज्या वेगाने प्रसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.