‘चिलापी आणि रव मासे’ आणायचे आहेत, सुट्टी द्या’; पोलिस कर्मचार्‍याच पत्र व्हायरल

0

पुणे : पुण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या सुट्टी बाबतच्या पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे. गावाकडून मासे आणायला जाण्यासाठी सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे पत्र या पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहले आहे.

 

 खडक पोलीस ठाण्यातील पोलिसाच्या नावाने हे  पत्र आहे. सुट्टी मिळावी यासाठी एका वेगळ्या शैलीत आपल्या वरिष्ठांना पत्र लिहिलं असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या सहकाऱ्यांना चिलापी आणि रव मासे घेऊन यायचे कारण देत या कर्मचाऱ्याने वरिष्ठांना सुट्टी मिळण्याबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राची चर्चा मात्र सर्वत्र पसरली आहे.

दरम्यान, मासे आणायचे कारण देत दोन दिवस सुट्ट्या द्या असं पत्रात दिलेल्या मजकुरात नमूद करण्यात आलंय. तसेच, या पत्राबाबत वरिष्ठ पोलिसांना विचारले असता आमच्याकडे असं पत्र अजून आलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.