मुंबई : चिंचवडमध्ये राहुल कलाटे आणि नाना काटे यांची मते बघितली. तर ती भाजप उमेदवारापेक्षा किती तरी जास्त आहेत. बंडखोरी झाली नसती तर आमचा उमेदवार विजयी झाला असता. बंडखोरीमुळे चिंचवडमध्ये अपयश आल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेतेअजित पवार यांनी आपला पराभव मान्य केला आहे.
राहुल कलाटे यांना बराच सांगण्याचा प्रयत्न केला. जरा थांब पण माझ्या आवाहानाला त्याने प्रतिसाद दिला नाही. राहुल यांचा अर्जमाघारी निघू नये यासाठी फार मोठे प्रयत्न केले. त्याला राज्यकर्त्यांनी सगळ्या प्रकारच्या सहकार्य केले. तरीही राहुल आणि नानाकाटेची मते बघितली. तर, ती भाजप उमेदवारापेक्षा किती तरी जास्त आहेत.
टफ फाईट देण्याचा प्रयत्न केला. निवडणूक उशीरा झाली असती तर काही तरी मतांनी नाना काटे विजयी झाले असते, असेही पवारम्हणाले.