यापूर्वी राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेते स्थानिक नेत्यांनी कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरही कलाटे आपल्या बंडखोरीवर ठाम होते. आता आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने नेते सचिन अहिर हे राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी वाकड येथे आले आहेत. कलाटे यांच्याशी चर्चा सुरू आहे. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक नेते उपस्थित आहेत. आता या भेटीनंतर राहुल कलाटे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या भेटीला आले आहेत. शिवसेना नेते सचिन अहिर अहिर हे काही वेळापूर्वीच वाकड येथील कलाटे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. चिंचवड पोटनिवडणुकी करिता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यानंतर राहुल कलाटे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी दिल्यामुळे या निवडणुकीत सेनेचे राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कलाटे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. म्हणूनच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.