गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘त्या’ फोटोवर चित्रा वाघ भडकल्या

0

मुंबई : औरंगाबाद दौऱ्यावर असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती सराईत गुन्हेगारानी फोटो काढले आणि ते व्हायरल झाले. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ भडकल्या असून ‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक’, अशा शब्दात वाघ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात गुन्हेगारांनी पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांचं स्वागत केल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. कलाम कुरेशी, सय्यद मातीन आणि जफर बिल्डर हे गंभीर गुन्हे असलेले तिघे जण फोटोत पाहायला मिळत आहेत. या फोटोवरुन चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या. ट्विट करुन त्यांनी गृहमंत्र्यांवरच निशाणा साधला.

बलात्कारी व गुन्हेगारांना “शक्ती” देण्याची मोहीमच जणू गृहमंत्र्यांनी उघडलीये. अन्याय अत्याचारग्रस्त महिलांची भेट घेण्यास त्यांचे सात्वंन करण्यास गृहमंत्र्यांना वेळ नाही पण गुन्हेगारांना बलात्काऱ्यांना बळ देण्यास मात्र तत्पर… ‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक’, अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी केलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.