हिंजवडी : मारुंजी गावाच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या जय हनुमान ग्रामविकासच्या उमेदवाराना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन सरपंच ॲड. प्राची चंद्रकांत बुचडे केले आहे.
आज बुधवारी जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या वतीने सांगता सभा घेतली. त्यावेळी प्राची बुचडे बोलत होत्या. संतोष बुचडे यांनी प्रस्तावना केली.
मारुंजी गावाच्या निवडणुकीच्या रिंगणात जय हनुमान ग्रामविकास पॅनलकडून सुशिक्षित आणि तरुण उमेदवार अर्जुन बाबुराव बुचडे, कावेरी संदीप बुचडे, दत्तात्रय तुकाराम सुतार उभा आहेत. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुंजबा चौकात आज प्रचार सभा आयोजित केली होती. त्या अगोदर संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली.
उमेदवारांच्या प्रचारार्थ आणि शक्ती प्रदर्शनासाठी काढण्यात आलेल्या रॅली आणि सभेला तरुण वर्ग आणि गावातील ज्येष्ठ मंडळींची उपस्थिती मोठी होती. महिला वर्गही या पॅनेलच्या प्रचारार्थ उत्स्फूर्त होता.
यावेळी माजी सरपंच ॲड. प्राची चंद्रकांत बुचडे यांनी मतदारांना करुन जय हनुमान ग्रामविकास पॅनलकडून सुशिक्षित आणि तरुण उमेदवार यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन केले. गावात वाढत्या लोकसंख्येमुळे नवं नवीन समस्या, प्रश्न निर्माण झाले आहेत, हे सोडवण्यासाठी हुशार आणि होतकरुंची गरज असून ती या उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळेच त्यांना बहुमताने निवडून द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी सभेला कपिल बुचडे, सुनिल बुचडे, समीर बुचडे, गणपत जगताप मोठ्या संख्येने मतदार पुरुष महिला तसेच तरुणवर्ग आणि गावातील आदी मान्यवर उपस्थित होते.