कोरिओग्राफर पुनीत पाठक अडकला लग्नाचा बेडीत

0

मुंबई ः डान्स रिएलिटी शोचा जज आणि बाॅलिवुडमधील प्रसिद्ध पुनीत पाठक नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. पुनीतने त्याची फियाॅन्से निधी मुनी सिंगसोबत विवाह केला आहे. पुनीतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. पुनीत लग्नाचे विधी करताना फोटोंमध्ये दिसत आहे.

पुनीतच्या पत्नीने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे आणि ज्वेलरी घातलेली आहे. तर, पुनीतने गुलाबी रंगाची शेरवानी घातलेली आहे. डोक्यावर फेटा घातलेला आहे. अशा पेहरावात ही जोडी राजाराणीसारखी दिसत आहे. पुनीतने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि काॅमेंट्सचा पाऊस पाडलसा आहे. यापूर्वी पुनीतने सोशल मीडियावर सांगितले होते की, ”११ डिसेंबरनंतर आयुष्याचा नाव चॅप्टर सुरू होणार आहे. हा माझ्या आणि तुझ्या आयुष्याचा सर्वात चॅफ्टर असेल.” २६ ऑगस्टला पुनीत व निधीचा साखपुडा झालेला होता. या साखरपुड्याचेदेखील फोटो व्हायरल झाले होते.

पुनीत बाॅलिवुडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. खतरो के खिलाडी-९ त्याने जिंकलेला आहे. तसेच एबीसीडी, नवाबजादे अशा चित्रपटांमधून कामही केलेले आहे. स्ट्रिट डान्सर थ्रीडीमध्ये तो शेवटचा दिसला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.