विमानतळावरील CISF महिला आणि पुरुष जवानाची वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या

0

पुणे : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील जवान व महिला कॉंस्टेबल यांनी एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अस्मिता दास (३०, मुळ रा. ओडिशा) आणि संजय कुमार (३०, मुळ रा. उत्तर प्रदेश) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. दोघेही लोहगावातील गुरुद्वारा कॉलनीत रहात होते.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता दास आणि संजय कुमार दोघेही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नियुक्तीला होते. पोलीस काँस्टेबल म्हणून त्यांची विमानतळावर नेमणूक करण्यात आली होती. दोघेही वेगवेगळ्या घरात रहात होते. सोमवारी अस्मिता दास हिची मैत्रिणी तिला फोन करीत होती. परंतु, ती उचलत नसल्याने ती दास हिच्या घरी आली़ तरीही तिने दार न उघडल्याने पोलिसांना बोलावून दार उघडले असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

त्याचप्रमाणे संजय कुमार यांच्या घरातून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचे त्याच्या शेजारच्यांनी कळविल्यानंतर दरवाजा उघडून आत पाहिले असता संजय कुमार यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. दोघांनी एकाच वेळी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.