वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिक अश्विनी जगताप यांच्या पाठीशी भक्कम

0

पिंपरी : महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी (दि. १६) चिंचवड, वाल्हेकरवाडी भागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे या शहराचे एकमेव विकासपुरूष होते. अश्विनी जगताप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे होत्या. आता आम्ही अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. त्या मतदारसंघाच्या सर्वांच्या जिवाभावाच्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत त्यांनाच विजयी करण्याचा निर्धार वाल्हेकरवाडीतील जनतेने व्यक्त केला.

भाजपा व मित्र पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी गुरूवारी वाल्हेकरवाडीत घरोघरी जाऊन सर्व नागरिकांशी संवाद केला. यावेळी माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेविका करुणा चिंचवडे, भाजपचे शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिवले यांच्यासह भाजप तसेच बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या मित्र पक्षांचे त्या भागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पती लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे जगताप कुटंब पोरके झाले असले तरी मतदारसंघातील जनतेने आम्हाला त्याची कधीही जाणीव होऊ दिली नाही. मतदारसंघातील जनता आमचे कुटुंबच आहे. मी तुमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे. संपूर्ण मतदारसंघाला आपले कुटुंब मानणाऱ्या माझ्या पतीने प्रत्येक कुटुंब उभे राहावे यासाठी विकासाचे काम केले. मतदारसंघातील विकासाचा हा रथ असाच पुढे चालू ठेवायचा आहे. त्यासाठी आपण माझ्या पदरात मताचे दान टाकावे, असे आवाहन अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी नागरिकांना केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी काहीही कमी पडू देणार नसल्याचे वचनही त्यांनी नागरिकांना दिले.

वाल्हेकरवाडी भागातील नागरिकांनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे जोरदार स्वागत केले. जागोजागी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या संवाद फेरीमुळे वाल्हेकरवाडी भाजपमय झाले होते. चिंचवड आणि वाल्हेकरवाडी भागातील नागरिकांनी कायमच भाजपला साथ दिली आहे. चिंचवड मतदारसंघाच्या विकासासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मोठे योगदान दिलेले आहे. त्यांचे विकासातील योगदान विसरण्यासारखे नाही. त्यांनी विकासाच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. ते शहरातील एकमेव विकासपुरूष होते. अश्विनी जगताप ठामपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. आता त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे असल्याच्या भावना वाल्हेकरवाडीतील नागरिकांनी व्यक्त केल्या. पोटनिवडणुकीत अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धारही वाल्हेकरवाडीतील नागरिकांनी व्यक्त केला.  

Leave A Reply

Your email address will not be published.