मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. 18 ते 45 वयोगटातील सर्वांना डोस उद्या पासून दिला जाणार आहे. मात्र लसीचे डोस कमी असल्याने नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार कंबर कसून मैदानात उतरली आहे.
संवादातील महत्वाचे मुद्दे :-
– राज्यातील प्रमुख उद्योजकांशी बोललो आहे. कामगार युनियनसोबत बोलला आहे. सर्व पातळीवर प्रयत्न करत आहोत. तिसरी लाट सर्वांच्या मदतीने थोपवण्याचा प्रयत्न करत आहोत.
– जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. एक कोटी 58 लाख जणांचे लसीकरण पूर्ण केले आहे. चाचण्यांच्या बाबतीत ही आपण एक नंबरचे राज्य आहे. 2 विनंती पंतप्रधानांनी मान्य केल्या आहेत. त्याबद्दल पंतप्रधानांने आभार मानले आहेत.
– 1 मे पासून 18 च्या पुढील वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी राज्यांवर आहे. राज्यात 18 ते 45 दरम्यानचे 6 कोटी लोकं आहेत. 12 कोटी लसी यासाठी लागतील. लस विकत घेण्याची तयारी ठेवली आहे.
– लसीच्या पुरवठ्याबाबत मर्यादा आहे. दोन्ही कंपन्यांशी बोललो आहोत. लसीची उत्पादन क्षमता लक्षात घेतली तर आपल्याला 18 लाख लसी मिळणार आहेत. राज्याला असं पत्र आलं आहे.
– आता थांबून चालणार नाही. लसीचा पहिला डोस देऊन पुढे जावं लागेल. सरकार ते दिल्याशिवाय राहणार नाही. उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरु करणार आहोत. जसे-जसे लसी उपलब्ध होतील तसं लसीकरण सुरु होईल.
– जूननंतर लसीचा पुरवठा वाढेल. लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका. उद्यापासून पहिला डोस दिला जाणार आहे. शेवटचा नाही. त्यामुळे घाई करु नका. असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी आवाहन केलं आहे.