पुणे : सातारा येथून मुंबईकडे जाताना रविवारी एकनाथ शिंदे पुण्यात दाखल झाले होते. शिवाय अधिकाऱ्यांची भेट घेत पुलासंदर्भात माहिती घेतली आहे. हा पूल 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान पाडण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज चांदणी चौकातील कामाची पाहणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा शुक्रवारी चांदणी चौकात अडविण्यात आला होता. संतप्त पुणेकरांनी तुमच्या ताफ्यामुळेच वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप केला होता. या प्रकारामुळे दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा प्रकार चांदणी चौकात नवा नसून गेली कित्येक वर्षे वाहतूक कोंडी होत असते, त्यातच पुलांची बांधकामे रखडल्याने यात गेल्या दोन वर्षांपासून भर पडली आहे. सातारा येथून मुंबईकडे येताना रविवारी एकनाथ शिंदे पुण्यात दाखल झाले होते. शिवाय अधिकाऱ्यांची भेट घेत पुलासंदर्भात माहिती घेतली आहे. हा पूल 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान पाडण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली.
पुणे मुंबई हायवेवर 100 मार्शल तैनात राहणार आहेत जे की वाहतुकीचे व्यवस्थापन करणार आहेत. तसेच पंधरा दिवसांमध्ये आपण या ठिकाणच्या नागरिकांना दिलासा देऊ, शेवटी नागरिकांना दिलासा देणे हे राज्य शासनाचे काम आहे. आम्हा सर्वांचे जबाबदारी आहे आणि तसे आदेश आम्ही सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.
शनिवारी अधिकाऱ्यांना चांदणी चौकातील कामाची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. आज अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच येत्या पंधरा दिवसांमध्ये या सर्व समस्या सोडवण्यात येतील, मागे जो काही झाला तो गोंधळ सोडून देऊ आणि आपण नवीन काहीतरी चांगले करूया आणि नागरिकांना दिलासा देऊया, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
चांदणी चौकामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, रस्ते विकास महामंडळ आणि त्या पोलीस महानगरपालिकांच्या हद्दी असल्यामुळे यामध्ये फार मोठा गोंधळ होत असतो. तो मागचा सर्व गोंधळ विसरून आता तसे आदेश आम्ही सर्वांना दिले आहेत की नागरिकांना आधी मदत करा, ते कुणाच्या हद्दीत आहे नंतर बघू आणि आता सगळं नागरिकांसाठी चांगलं करू, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांमध्ये नागरिकांना दिलासा द्या असे आदेशच सर्वच या तिन्ही वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर उद्यापासून या ट्रॅफिकचे नियोजन हे मार्शल करतील.
येथील जुना जो पूल आहे तो पूल पाडला जाणार आहे, तो कसा पाडायचा त्यासाठी कुठलं साहित्य वापरायचे याचाही अधिकाऱ्यांनी अभ्यास केलेला आहे. नोएडामध्ये जी बिल्डिंग नुकतीच पाडली आहे तिथल्याही लोकांची अधिकाऱ्यांचे बोलणे झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.