जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक…

0

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पूंछ भागात आज (सोमवार) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे 5 जवान शहीद झाले आहे. सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. या चकमकीत जेसीओसह पाच जवान शहीद झाले आहेत.

J-K: JCO, 4 soldiers lost their lives during counter-terrorist operation in Pir Panjal ranges

Read @ANI Story | https://t.co/LL3jAEQN5h
#CounterTerroristOperation pic.twitter.com/SAbprRLLjA

— ANI Digital (@ani_digital) October 11, 2021

जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील (poonch district) डेरा की गली भागात सुरक्षा दल
आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत (Poonch Terrorist Attack) जेसीओसह पाच जवान शहीद झाले.
मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 4 दहशतवाद्यांनी सीमा पार करुन पूंछ जिल्ह्यात घुसखोरी केली होती.
त्यानंतर हे दहशतवादी काश्मीर खोऱ्याचे (Kashmir Valley) दिशेने रवाना झाले.

A junior commissioned officer (JCO) & four soldiers killed in action during a counter-terrorist operation in the Rajouri sector in the Pir Panjal ranges: Sources

— ANI (@ANI) October 11, 2021

भारतीय सुरक्षा दलानं (Indian security force) मुगल रोड जवळील डेरा की गली परिसरात या चार दहशतवाद्यांना घेरलं.
त्यानंतर भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार (Firing) सुरु झाला. या चकमकीत 5 सैनिक गंभीर जखमी झाले होते.
त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.