पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता 1 ते 8 वीच्या शाळा बंद

0

पुणे : कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे जिल्हयासह शहर आणि पिंपरीमध्ये देखील कोरोनाचे रूग्ण झपाटयाने वाढताहेत. त्यामुळे जिल्हा, शहर आणि पिंपरीमधील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार कोरोना आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, इयत्ता 9 वी चे वर्ग सुरू राहणार आहेत. इयत्ता 1 ली ते 8 वी चे वर्ग ऑनलाइन पध्दतीनं सुरू राहतील.

आयसीएमआर डीजी भार्गव यांच्याशी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली आहे. 30 जानेवारी 2022 पर्यंत इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा ऑफलाईन पध्दतीनं बंद राहतील पण त्यांचे वर्ग ऑनलाइन सुरू राहतील. 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. अजित पवार यांनी कोणत्या पध्दतीचा मास्क वापरावा हे देखील पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे.

उद्या सकाळी 9 वाजता राजेश टोपे आणि प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत आपली बैठक असल्याचं अजित पवार यांनी सांगितले. त्यामध्ये देखील आरोग्य यंत्रणेबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी समन्वय साधून आणखी काही निर्णय घेण्यात येणार आहेत. पुण्यात मास्क नसेल तर 500 रूपये दंड आणि मास्क नसेल आणि थुंकला तर 1 हजार रूपये दंड वसुल करण्यात येणार आहे.

दोन डोस घेणार्‍यांच रेस्टॉरंट आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे दरम्यान, पुणे शहरात सध्या तरी इतर सर्व गोष्टी कोरोनाचे निर्बंध पाळून म्हणजेच सर्व नियम पाळून चालु राहतील हे स्पष्ट केले आहे. 60 वर्षाच्या वरील व्यक्तींना देखील बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील उपहार गृह, रेस्टॉरंट, मॉल, चित्रपट गृहांमध्ये दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. आगामी काळात त्यामध्ये कोणालाही सवलत देण्यात येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.