हवामान बदल… हिवाळ्यात पाऊस, ढगाळ वातावरण 

0

मुंबई ः राज्यातील हवामान अचानक बदलले आहे. सगळीकडे ढगाळ वातावरण पसरलेले आहे. मुंबईतील काही भागांमध्ये रिमझीम पाऊसदेखील झालेला आहे. डहाणूमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची सुरूवात झाली ती सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू होती.

मुंबई हवामान विभागाने ९ ते १४ डिसेंबर दरम्यान डहाणूमध्ये ढगाळ वातावरण असेल, तसेच ११ डिसेंबरला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर मुंबई आणि कोकण भागातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सोलपुरमध्ये पाऊस पडला आणि तसेच आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हिवाळाच्या दिवसांमध्ये पाऊस पडणे, हा हवामान बदल असल्याचे सांगितले जात आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांनी फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिकू, आंबा, भाजपाली, आणि पशुधन याची काळजी घ्या, असे आवाहान कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.